संरक्षण संकेतस्थळावर पाकिस्तानचा सायबर हल्ल्याचा प्रयत्न   

नवी दिल्ली : पाकिस्तानने पुन्हा एकदा सायबर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानच्या ‘पाकिस्तान सायबर फोर्स’ नावाच्या ‘एक्स’ खात्याने भारतीय संरक्षण संस्थांचा संवेदनशील डेटा हॅक केला आहे. यामध्ये सैन्य अभियांत्रिकी सेवा (एमईएस) आणि मनोहर पर्रीकर अभ्यास आणि विश्लेषण संस्थेचा (एमपी- आयडीएसए) डेटा चोरीचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, संरक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत आर्मर्ड व्हेईकल निगम लिमिटेड (एव्हीएनएल) च्या अधिकृत संकेतस्थळावर हल्ला करुन पाकिस्तानी झेंडा आणि ‘अल खालिद’ टँकची छबी प्रदर्शित करण्यात आली आहे.
 
‘पाकिस्तान सायबर फोर्स’ने संरक्षण कर्मचार्‍यांची संवेदनशील माहिती आणि लॉग इन तपशील आम्ही मिळविला असल्याचा दावा केला आहे. ‘एव्हीएनएल’वर हल्ला करुन ती अस्थायीपणे बंद करण्यात आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सायबर सुरक्षा पायाभूत सुविधा आणि डिजिटल संरक्षण यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय लष्कर योग्य आणि आवश्यक उपाययोजना करत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Related Articles